चंद्रपूर : भरधाव धावणारे वाहन उड्डाणपुलाचा खाली कोसळले.या दुर्घटने एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना बाबुपेठ-बल्हारपूर रेल्वे उड्डाणपुला जवळ चार वाजताचा दरम्यान घडली. अभिषेक गुप्ता असे मृतकाचे नाव आहे.
चंद्रपूर येथून बल्हारपूरकडे निघालेले भरधाव MH 34 BR 0141 चारचाकी वाहन बाबुपेठ-बल्हारपूर रेल्वे उड्डाणपुलाचा खाली कोसळले. या भिषण दुर्घटनेत वाहनातील एका यूवकाचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील इतर तीघे गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी मृत्यू झालेल्या यूवकाचे नाव अभिषेक गुप्ता असे आहे. वाहनातील चारही युवक मद्यधूंद अवस्थेत होते. वाहन कोसळल्यावर गंभीर अवस्थेत असलेला एक यूवक दारूची बाटल घेऊन निघाला, असे प्रत्यदर्शीचे सांगत आहेत.
जखमी युवकांना वाहनांच्या बाहेर काढले अंबुलन्स ला बोलावीत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी अभिषेक गुप्ता नामक युवकाचा मृत्यू झाला तर उर्वरित मोहन रेड्डी, रोहित नागलवार, चिंटू तोगरवार हे जखमी असून दोघांवर खाजगी तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे, एकाची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगितले जाते. चारही युवक हे बल्लारपूर येथील रहिवासी आहे.
घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहेत.
COMMENTS