ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
या संदर्भात मुनगंटीवार यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा केली.
व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले.
या मागणीसंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रिसोर्ट व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. शिष्टमंडळासमक्ष मुनगंटीवार यांनी गुप्ता यांच्याशी चर्चा केली.
गुप्ता यांच्याशी चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. कोरोनाची रूग्णसंख्या आता आटोक्यात आली असल्याने व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यास आता कोणतीही हरकत नाही. व्याघ्र प्रकल्प बंद असल्यामुळे परिसरातील रिसोर्ट व्यावसायिक तसेच त्यावर अवलंबून असलेल्या घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील एकही व्याघ्र प्रकल्प सद्यःस्थितीत बंद नाही. अशा परिस्थीतीत केवळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद असणे संयुक्तिक नाही. हा व्याघ्र प्रकल्प त्वरीत पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा.
शिष्टमंडळात संजय मानकर, संजय ढिमोले, आशिष पुराणिक, शुभम ढिमोले आदी होते.
Related
अंशतः निर्बंध लावून निसर्गपर्यटन सफारी सुरु ठेवण्याची मागणीJanuary 12, 2022In "महाराष्ट्र देशा"
आजपासून ताडोबा पर्यटनावर बंदीApril 15, 2021In "महाराष्ट्र देशा"
ताडोबा व्याघ्र पर्यटन कोरोनाकाळातही ठरले राज्यात अव्वलMarch 31, 2021In "महाराष्ट्र देशा"
COMMENTS