अखेर ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन सफारी सुरु
खासदार बाळू धानोरकर यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिरवी झें
चंद्रपूर : येथील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन (सफारी) नियमीतपणे सुरु करण्यात करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी त्याची दखल घेत आजपासून दिनांक १ फेब्रुवारी हि सफारी सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वने, आपदा व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई श्री. देवाशिष चक्रवर्ती प्रधान सचिव व अध्यक्ष महाराष्ट्र कार्यकारी समिती राज्य आपदा व्यवस्थापन यांचे आदेश पत्र क्र NO : DMU / 2020 / CR. 92 / Dis M -1, Date 31-1-2022 द्वारे जारी करण्यात आले आहे.
या आदेशात पहिल्या डोसचे ९० टप्पे व्हॅक्सिनेशन झालेले जिल्हे व ७० टक्के दोन्ही डोज झालेले जिल्हे ज्यात चंद्रपूर, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, पुणे, मुंबई, सातारा इत्यार्दी जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील हे सर्व प्रकल्प आपल्या नियमित वेळेनुसार ऑन लाईन बुकिंगद्वारे आज १. २. २०२२ दुपार पासून सुरु होत आहे.
COMMENTS