जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशनची मुक्ताईनगर कार्यकारिणी जाहीर.वेब पोर्टल पत्रकारांच्या हक्काच्या संघटनेत पत्रकार होतोय सामील.संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील वेब मीडिया असोसिएशन कार्यकारिणी केली जाहीर.
वेब मीडिया असोसिएशन मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष पदी सतीश गायकवाड व सचिव पदी अक्षय काठोके यांची निवड.
जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशन जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल पत्रकार यांनी या संघटनेत सामील होताना दिसून येत आहे.
आज मुक्ताईनगर येथे वेब मीडिया असोसिएशन रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संगठना राज्यभर कार्यरत असून वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. संगठनेचे अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया अध्यक्षतेखाली, जिल्हाउपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हासचिव दिनेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस अमोल व्यवहारे, जिल्हा संघटक एस एन भुरे याच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
मुक्ताईनगर येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते मुक्ताईनगर तालुका आणि शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली
मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष गणेश महाजन, तालुका सचिव अक्षय काठोके,
तालुका सरचिटणीस विनोद बेलदार, तालुका समन्वयक शाकीर शेख, तालुका खजिनदार प्रमोद सौंदळे यांची निवड करण्यात आली.
तसेच मुक्ताईनगर शहराध्यक्ष अक्षय पालवे , उपाध्यक्ष पंकज कपले, शहर सचिव पंकज तायडे, शहर सरचिटणीस अमोल वैद्य, शहर समन्वयक आतिकखान, शहर खजिनदार अजगर शेख , सदस्य देवेंद्र काटे, सदस्य पंकज पाटील, सदस्य विठ्ठल धनगर, सदस्य योगेश पाटील, सदस्य रवी पोहेकर बैठकीला उपस्थित होते.
वेब मीडिया असोसिएशन मुक्ताईनगर तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.
COMMENTS