जामनेर तालुका वेब मीडिया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांची पहिली मीटिंग संपन्न.विविध विषयावर चर्चा करीत संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात आली.
विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल व जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती.
तर वेब मिडीया असोसिएशन मध्ये आज दाखल झालेले नवीन पदाधिकारी – अलियार खान रशीद खान व इम्रान खान रमजान खान यांचे स्वागत करण्यात आले.
जामनेर (प्रतिनिधी)
सध्या जळगाव जिल्ह्यात सर्वदुर चर्चेत असणारी वेब मिडीया असोसिएशन जामनेर पदाधिकारी व सदस्य यांची बैठक निसर्गरम्य वातावरणात आज सायंकाळी संपन्न झाली.बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया, जिल्हा संघटक एस एन भुरे, जिल्हा सचिव दिनेश चौधरी, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने हे उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व पदाधिकारी व सदस्य यांची ओळख परिचय करून देण्यात आला. तर जामनेर तालुका वेब मिडीया’त नवीन दाखल झालेले प्रबिधनी न्युज चे तालुका प्रतिनिधी अलियार खान रशीद खान व शहर प्रतिनिधी इम्रान खान रमजान खान यांचे स्वागत करण्यात आले.
बैठकिला मार्गदर्शन करतांना वेब मिडीया असोसिएशन जामनेर’ची पुढील कामकाज पध्दती व रूपरेषा कशी असणार ? हे सर्व नियम अटी व बंधने याबाबत मार्गदर्शक करण्यात आले. तसेच वेळोवेळी मिळणाऱ्या सुचना व मार्गदर्शन प्रमाणे सर्व पदाधिकारी काम करतील, तसेच सर्व पदाधिकारी एकसंघ पध्दतीने काम करतील असा निर्णय सर्वानुमते झाला.यावेळी सर्वांचे समस्या ऐकुन त्या अनुषंगाने विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मीटिंगला विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव ),
जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र कार्यकारी संपादक ),
जिल्हा सचिव- दिनेश चौधरी,
जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक ),
जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक ),
तालुका अध्यक्ष -श्री.पंढरी पाटील ( जामनेर लाइव्ह न्युजचे संपादक )
तालुका उपाध्यक्ष -श्री. शे.हमीद शे.रफिक ( स्टार 18 न्युज चे संपादक )
तालुका उपाध्यक्ष श्री. संतोष पांढरे ( न्युज टुडे 24 व न्यूज 24 एक्सप्रेसचे )
तालुका सचिव -श्री.अनिल शिरसाठ ( महाराष्ट्र 24 तास’चे )
तालुका सरचिटणीस-श्री. शे.अझहर शे. रफिक ( प्रगती मिडिया हिंदी न्युज )
तालुका समन्वयक- श्री.सुपडू जाधव ( JBN महाराष्ट्र न्युज )
तालुका मार्गदर्शक – श्री.शांताराम जाधव ( देशमित्र न्युज )
तालुका सदस्य – श्री. अभिमान झाल्टे ( सत्यमेव जयते )
तालुका सदस्य – श्री.फरहाज अहमद ( खान्देश प्रभात चे )
तालुका सदस्य – श्री.रविंद्र लाठे ( लाईव्ह ट्रेण्ड चे )
तालुका सदस्य -श्री.रमेश तेली ( JBN महाराष्ट्र न्युज )
तालुका सदस्य -श्री.बाळू जोशी ( सकाळ चे )
तालुका सदस्य - अलियार खान रशीद खान (प्रबोधनी न्यूज तालुका प्रतिनिधी )
इम्रान खान रमजान खान (प्रबोधनी न्यूज शहर प्रतिनिधी )
हे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थिती होते.
जामनेर तालुका वेब मीडिया असोसिएशन यांची पहिली मीटिंग निसर्ग रम्य व खेळीेमेळीच्या वातावरणात पार पडली.
COMMENTS