दीपिका भामरे गरजू मुलान सोबत सवांद साधला आणि त्यांचे पालकांना सोबत संवाद साधला
पक्षीय काम करतांना फिरावं लागत,असेच एकदा येथून प्रवास करतांना लहान मुलं खेळतांना दिसली साहजिकच मी ही माझ्या बालपणात हरवले गेले.गाडी थांबवून त्यांच्या सोबत संवाद साधतांना त्यांच्या
समस्या ही समजावू घेतल्या.सोबत असलेला खाऊ त्या मुलांना देतांना त्यांच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव बघून मला ही गहिवरून आलं.मुलांच्या सोबत संवाद साधतांना त्यांच्या पालकांसोबत ही संवाद साधला गेला.त्यांचा समस्या कळत असतांना समाधानाची लहर ही समजली.त्यांचा निरोप घेतांना एक लहान लेकरू गाडी मागे धावताना आपल्या बोबड्या स्वरात म्हणालं दीदी तू पुन्हा उद्या येतेस? आणि मी ही डोळ्यातील पाणी पुसत हो म्हणाली आणि घराकडे परतन्यास निघाली.
COMMENTS